scorecardresearch

नवी मुंबई : दिघोडेत जलवाहिनी फुटून नुकसान; दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा आंदोलनाचा पवित्रा

दोन वर्षांपूर्वी हेटवणे ते नवी मुंबई यामार्गावरील सिडकोची प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे घरांना पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नागरिकांना तात्काळ मदतीचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

नवी मुंबई : दिघोडेत जलवाहिनी फुटून नुकसान; दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा आंदोलनाचा पवित्रा
हेटवणे जलवाहिनी फुटून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे आंदोलन

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीला १७ डिसेंबर २०२० ला मोठी गळती लागली होती. परिणामी दिघोडे, वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या घराचे तसेच अनेक वस्तू आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात आले आहे. नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा- मुंबईतील घाऊक बाजारात कोथींबीर जुडी ८०रुपयांना! पावसामुळे बाजारात ६०% पालेभाज्या खराब

दोन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई नाही

हेटवणे जलवाहिनी फूटून दोन वर्ष झाली. मात्र, अद्याप नूकसानग्रस्त रहिवाशांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच नूकसानग्रस्त रहिवाशांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.मनिष पाटील हे उपोषण सुरू केले आहे. पाटील यापूर्वीही जिल्हाधिकारी रायगड, सिडको, उरण तहसीलदार यांच्याशी अनेकदा चर्चा ही केली होती. मात्र सिडकोकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नुकसानग्रस्तानी आणखी किती वाट पहायची असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा- उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन

नूकसानग्रस्त रहिवाशांच्या घरांचे, व्यवसायिकांच्या दुकानाचे पंचनामे हे महसूल विभागाचे अधिकारी आणि दिघोडे ग्रामपंचायतीने तातडीने केले होते. आणि तशा प्रकारचा अहवाल सिडकोकडे सादर करण्यात आला आहे. यावेळी सिडकोकडून नूकसानग्रस्त रहिवाशांना, व्यावसायिकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू नूकसानग्रस्त रहिवाशांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही आजतागायत सिडकोकडून रहिवाशांना आर्थिक मदत देण्यात आली नाही. सिडकोच्या विरोधात तसेच नूकसानग्रस्त रहिवाशांना सिडकोकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.