नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात सोमवारी कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या असून त्याची विधिवत पूजा करून हंगामाला सुरुवात करण्यात आली. यंदा हवामान बदलाने हापूसच्या उत्पादनाला फटका बसला. हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच कडाक्याची थंडी त्यामुळे अतिमोहोर फुटला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली नाही. थ्रिप्स रोगामुळेदेखील मोहोर गळून गेला.

सोमवारी बाजारात कोकणातील हापूसच्या २४ पेट्या दाखल झाल्या होत्या. दाखल झालेल्या हापूसची ४ ते ६ डझनाची एक पेटी १० हजार ते १५ हजार रुपये बाजारभावाने विक्री होत आहे. दरम्यान, यावर्षी हापूसचे उत्पादन चांगले असेल. हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात होत असून १५ मार्च नंतर बाजारात हापूसची आवक वाढणार आहे, अशी माहिती एपीएमसी फळबाजारचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.