नवी मुंबई : खारघर येथील ओवे गावातून बेकायदा राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी ३० वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले . ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे.  बादल मोइनोद्दीन खान, कलम खान, असीम शेख असे यातील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >>> द्रोणागिरी नोड मध्ये सिडकोची तोडक कारवाई; अनधिकृत झोपड्या, दुकाने, टपऱ्या हटविल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओवे गावात बेकायदा भारतात प्रवेश करून आलेले काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. आरोपी पैकी बादल हा ३० वर्षांपासून भारतात राहत असल्याचे समोर आले आहे. बादल लहान असतानाच आपल्या पालकांच्या समवेत भारतात आला होता. तर अशाच प्रकारे असीम सुद्धा पालकांच्या समवेत ३५ वर्षांपूर्वी भारतात आलेला आहे. तर कमल हा २०१३ पासून भारतात आला होता.  या बाबत अधिक तपास केला जात आहे.