जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने आयोजित वॉकेथॉ़नमध्ये ४०० हून अधिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक व दिव्यांग व्यक्तींनी सहभागी होत दिव्यांगत्वाविषयी तसेच स्वच्छता आणि सर्व शिक्षा अभियानाविषयी जनजागृती केली.सीवूड रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूलाच्या खालील बाजूने सुरू झालेल्या वॉकेथॉनला सकाळी ७.३० पासूनच दिव्यांग मुले, त्यांचे पालक तसेच दिव्यांग व्यक्तींनी उपस्थित राहत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

महापालिका मुख्यालयापर्यंत दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारांविषयी तसेच शहर स्वच्छतेविषयी विविध घोषणा देत या वॉकेथॉनच्या माध्यमातून दिव्यांगांनी व्यापक स्वरूपात जनजागृती केली. मुख्यालयामध्ये मनोरंजन आणि प्रबोधनाचा एकत्रित अविष्कार असणारे पथनाट्य नाट्यशाळा संस्थेच्या कलाकारांनी सादर केले. आयुष चांडक या दिव्यांग विद्यार्थ्याने आपल्याला ऐकू येत नाही हे पालकांना सुरूवातीला कळलेच नाही असे अनुभवकथन केले. यावर डॉ. जितेंद्र गव्हाणे यांनी मुल जन्मल्यानंतर त्यांच्या स्क्रिनींग टेस्ट करण्याचे महत्व अधोरेखीत केले. इडियन पेडियाट्रिक असोशिएशन नवी मुंबई अध्यक्ष डॉ. जितेंद्र गव्हाणे यांनी शारीरिक कमतरतेमुळे कुणी व्यक्ती सामाजिक प्रवाहात मागे राहता कामा नये हे आपले ध्येय असून २०३० पर्यंत ते साध्य करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने नवनवीन संकल्पनांचा वापर करणे गरजेचे असून या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका इटीसी केंद्राच्या माध्यमातून आघाडीवर आहे, शिवाय नवजात अर्भकांच्या सुदृढतेच्या दृष्टीने आवश्यक स्क्रिनींगमध्येही नमुंमपा आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: ‘त्या’ कर्तव्यदक्ष पोलीसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही प्रशंसा करण्यासारखी बाब असल्याचे सांगितले. यापूर्वी प्रचलित ६ प्रकारच्या दिव्यांगत्वामध्ये आता आणखी प्रकार समाविष्ट करीत लोकोमोटर दिव्यांगत्व, कुष्ठरोग निवारणपश्चात, सेरेब्रल पाल्सी, शारीरिक वाढ कुंठीतता, स्नायूविकृती, ॲसीड ॲटेक ग्रासीत व्यक्ती, दृष्टीदोष, अंधत्व, अंशत: अंधत्व, कर्णबधिरत्व, वाचिक व भाषिक दिव्यांगत्व, बौध्दीक अक्षमता, विशिष्ट अध्ययन अक्षमता, स्वमग्नता, मानसिक वर्तनविषयक आजार, बहुविध दृधन, पार्किसन्स, हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, बहुविकलांगता असे दिव्यांगत्वाचे २१ प्रकार असल्याबाबतची जनजागृती वॉकेथॉनच्या माध्यमातून करण्यात आली.