खारघर वसाहतीमधील सेक्टर १० येथे निरसूख नावाचा नवीन रेस्ट्रोरेन्ट आणि बार सूरु झाल्याने रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन करुन थेट निरसूख बारविरोधात मोर्चा काढला. बारवरील मोर्चानंतर थेट बारचे शटर बंद करुन हा बार बंद झाल्याची घोषणा आक्रमक कार्यकर्त्यांनी केली. भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी खारघरमधील नागरिकांच्या मागणीचा विचार करुन या परिसरात शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात असल्याने खारघरला बारघर होऊ देणार नाही असे सांगितले होते. ठाकूरांच्या आदेशानंतर भाजपाच्या पदाधिका-यांनी बारवर मोर्चा काढून बार बंद केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या माजी नगरसेवक आणि भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सक्रीय दिसल्या.

हेही वाचा- पनवेल: शिक्षक ऑनलाईन बदलीत पुन्हा घोळ

खारघर हा परिसरात अद्याप सरकारने दारु विक्रीस मनाई क्षेत्र (नो लिकर झोन) असा जाहीर केलेला नाही. पनवेल पालिकेमध्ये नवीन मद्य विक्रीचे परवाने देऊ नये म्हणून पालिकेच्या सभागृहात भाजप व विरोधी गटाच्या घटकपक्षांच्या पालिका सदस्यांनी ठराव घेऊन तो राज्य सरकारकडे पाठविला. मात्र, अशी सरसकट दारु बंदी करता येत नसून पालिकेच्या प्रभाग निहाय दारु बंदी होऊ शकते असे शासनाच्या विविध विभागाने या ठरावाला उत्तर देताना कळविले होते. तसेच खारघरमधील सेक्टर ७ येथील रॉयल ट्युलिप या हॉटेलमध्ये आजही दारुविक्री सूरु आहे. सनदशीर मार्गाने रॉयल ट्युलिप या हॉेटेलचे व्यवस्थापन आणि खारघरमधील सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात काही वर्षांपुर्वी याच मद्यविक्रीच्या परवान्यावरुन वाद झाला. मात्र यामध्ये रॉयल ट्युलिप हॉटेलचे व्यवस्थापनाने त्यावेळच्या भाजपच्या राज्य सरकारला त्यांची बाजू कायदेशीर मार्गाने पटवून दिल्याने या हॉेटेलमध्ये दारु विक्रीस परवाना मिळाला. सध्या रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये सव्वाशे कर्मचारी काम करतात. तसेच कोपरा गाव आणि खारघरच्या वेशीवरील तसेच पनवेल शीव महामार्गाला खेटून असणारा अजीत पॅलेस या हॉेटेलमध्येही दारु विक्री सूरु आहे. खारघर वसाहतीला खेटून हा व्यवसाय गेली अनेक वर्षे सूरु आहे. खारघरमधील मद्यपी कोपरा येथील अजित पॅलेस आणि खारघर वसाहतीमधील रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये मद्य पिण्यासाठी जात असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच अनेकदा खारघरचे मद्यपी बेलापूर येथील मद्याच्या दूकानातून दारुच्या बाटल्या खरेदी करुन स्वताच्या घरी आणून ठेवत असल्याचे समोर आले आहे. खारघरमध्ये मद्याचे दूकान नसल्याने अनेक मद्यपींचा विचार करुन खारघरमध्ये १२ विविध किराणा मालाच्या दूकानमालकांनी दारुविक्री जोरदार सूरु केल्याची चर्चा आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी हे एकमेकांकडे बोट दाखवून या अवैध दारुविक्रीकडे कानाडोळा करतात.