scorecardresearch

‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा

नवीन पनवेल उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा
नवीन पनवेल उड्डाणपुलावर खड्ड्यांचे सामराज्य

नवीन पनवेल येथील उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी रस्त्यावर उतरत आहेत. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने या उड्डाणपुलाच्या खड्यांविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उड्डाणपूलावरील खड्डे बुजवले नाहीत तर आंदोलन करु असा इशारा पनवेल शहर भाजपाचे उपाध्यक्षांनी सिडको मंडळाला दिला आहे. वेळीच हे खड्डे बुजवले नाहीत तर भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

हेही वाचा- इंदोर येथील ‘राष्ट्रीय खेल स्पर्धे’त उरणच्या जलतरणपटूंना यश; ९ सुवर्ण पदकं पटकावत कोरलं नाव

वाहनधारकांना खड्ड्यांचा त्रास

गेल्या अनेक महिने नवीन पनवेलवासीय आणि पूर्वभागाकडून पनवेल शहरात येणा-या विविध ग्रामस्थांना उड्डाणपुलावरील खड्डे व त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच खड्यात अनेकदा विद्यार्थी जखमी झाले आहेत. उड्डाणपुल सूरु झाल्यानंतर व संपल्यावर दोनही बाजूंना खड्डे पडले आहेत. त्यामुळे तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा- वेदान्त प्रकल्पाविरोधात उरणमध्ये शिवसेनेकडून निषेध; सह्यांची मोहीम घेत सरकारविरोधात घोषणाबाजी

सिडको मंडळाकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात

उड्डाणपुलावरील खड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये प्रवाशाचे प्राण गेल्यास पोलीसांनी संबंधित सरकारी यंत्रणेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी लेखी स्वरुपात केली आहे. विशेष म्हणजे सिडको मंडळाने मंगळवारीपासूनच खड्डे बुजविण्याची सूरुवात केली असून उड्डाणपुलावरील खड्यात पेव्हरब्लॉक टाकून खड्डे बुजविण्याचे काम सिडको मंडळाचे अधिकारी करत होते. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी हे काम सूरु असताना मनसेचे पदाधिकारी योगेश चिले व त्यांच्यासह इतर पदाधिका-यांनी कामाचा दर्जावर बोट दाखवत हे काम बंद केले होते. सध्या नवीन पनवेल येथील उड्डाणपुलावरील खड्डे हा शहरातील महत्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp warns cidco board to fill potholes on new panvel flyover or protest dpj

ताज्या बातम्या