करोनाकाळात भारतातील डॉक्टर व लसनिर्मितीसाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचं जगाला कौतुक करण्यात आले असून अत्याधुनिक उपकरणाची सुविधा सामान्यांना परवडणाऱ्या दरात नवी मुंबई येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल डी. वाय. पाटील समूह आणि डॉ. विजय पाटील यांचे हार्दिक अभिनंदन केले. डॉ. डी वाय पाटील समूहातर्फे दिली जाणारी रुग्णसेवा राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील अत्याधुनिक बाय- प्लेन कॅथ लॅबचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा- नवी मुंबई: ३० वर्षांपासून रखडलेला नाल्यावरील पुल अखेर मार्गी लागणार
भारताचे वैश्विक स्तरातील आरोग्याच्या योगदानाबद्दल आणि विशेषता करोनाच्या महामारीच्या दरम्यान भारतातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञानी करोना उपचारासाठी आणि व्हॅक्सिनच्या निर्मितीद्वारे तसेच करोना आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे अभिनंदन केले. शिवाय संस्कृतीमूल्य जोपासतच राष्ट्राची प्रगती शक्य असल्याचे आणि राष्ट्र विकसित करण्यासाठी संस्कृती आणि सभ्यता ही नीतिमत्ते जोपासत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत असल्याचे नमूद केले.
हेही वाचा- बोनससाठी कोकण रेल्वे कामगार आग्रही; सीबीडी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा
डॉ विजय पाटील यांनी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा यांच्या प्रगतीतूनच देश समृद्ध होऊ शकतो यावर ठाम विश्वास असल्याचे नमूद केले. शिवाय अशा प्रकारचे कॅथलॅब दक्षिण आशियातील प्रथम दर्जाचे असून डी वाय पाटील समूह तर्फे लोक आणि राष्ट्रसेवेसाठी करण्यात येणारे एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याच नमूद केले. राष्ट्राच्या प्रगतीसाठी जी कुठली जबाबदारी दिली जाईल ती आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसाठी सर्वतोपरे पार पाडण्यासाठी कटिबद्ध असण्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले. नवीन मशीन द्वारे हृदय विकाराच्या अतिशय कठीण असलेल्या हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना सुद्धा जगातील सर्वोत्तम दर्जाची एंजिओग्राफी आणि ऍजिओप्लास्ठी करणे सहजतेने उपलब्ध झाल्याचे झाली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई: मोरा रो रो जेट्टीचा खर्च दहा कोटींनी वाढला
याप्रसंगी डी. वाय. पाटील समूहातील सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.