नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर ५ येथे कै. अण्णासाहेब पाटील स्मृतिभवन बांधले आहे. सूसज्ज व वातानुकूलित असलेल्या बहुउद्देशीय इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणा मात्र बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी लग्न सोहळे व इतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा निकामी असल्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना असुरक्षित वाटू लागले असून, सीसीटीव्ही यंत्रणा लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा – रायगड : खारघर हाऊसिंग फेडरेशन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

हेही वाचा – सावधान!… तुम्ही डाऊनलोड केलेले ॲप रिमोट कंट्रोल ॲप तर नाहीत ना ? काही क्षणात बँक खाते रिकामे होईल… वाचा नेमका काय प्रकार आहे? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आलेख पाहता या ठिकाणी होणारे लग्न सोहळे व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल कमी पडू लागले आहेत. त्यात लग्नसराईमध्ये हॉलचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारातात. त्यामुळे नवी मुंबईकरांना वातानुकूलित व कमी भाड्यात लग्न सोहळे, तसेच इतर कार्यक्रमांसाठी महापालिकेने शहरात बहुउद्देशीय भवन उपलब्ध करून दिले आहेत. कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील स्मृतिभवन सुरू करून ३ वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. हॉल भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने दिवसेंदिवस नागरिकांची पसंती वाढत आहे. परंतु या ठिकाणी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने नागरिकांच्या सामानाची चोरी होत आहे, असे मत नागरिक तुषार झगडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही यंत्रणा लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.