नवी मुंबई : सिडको महामंडळात ७९ वा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरण आणि मातृत्व सन्मानाच्या उद्देशाने राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ‘हिरकणी कक्ष’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उभारण्यात आलेल्या या कक्षाचे उद्घाटन सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या हस्ते पार पडले. 

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना अचानक प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे यंदाचे स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण तसेच ‘हिरकणी कक्ष’ उद्घाटनाची जबाबदारी शांतनू गोयल यांनी पार पाडली. यापूर्वी प्रजासत्ताक दिनीही ध्वजारोहण गोयल यांनीच केले होते.

या प्रसंगी सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, डॉ. राजा दयानिधी, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.‘हिरकणी कक्ष’ हा मातृत्व रजेवरून कार्यालयात परतणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खाजगी वातावरण देणारा विशेष कक्ष आहे. येथे स्