कोपरखैरणे विभागात मागील काही दिवपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने वारंवार वीज जात आहे. ऐनवेळी, दिवसभरात दोन ते तीन वेळा तासन तास वीज गायब होत असून नागरिक हैराण झाले आहेत पावसाळा सुरू झाला की केबलमध्ये बिघाड, कधी शॉर्ट सर्किट तर कधी ट्राम्सफार्मरला आग ,अशा घटना होत असतात. कोपरखैरणे विभागात भूमीगत असलेल्या वीजवाहिनी या जुन्याच आहेत. नागरीवस्ती ही चार ते पाच पटीने वाढल्याने या भागात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नवी मुंबई : मद्यपींच्या राड्यात युवक गंभीर जखमी ; कोपरखैरणेतील घटना

मागणी मात्र अधिक आणि पुरवठा प्रमाणीत असल्याने या भागात वीजपुरवठ्यावर ताण येत असून वारंवार वीज जाण्याच्या घटना घडत आहे. केबलमध्ये शॉर्ट सर्किट , ट्राम्सफार्मरला आग आशा घटना वारंवार घडत असतात,पावसाळ्यात याचे प्रणाम अधिक वाढते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ते खोदकामे केली जातात. कोपरखैरणे विभागात आधीच पदपथ नाहीसे झाले असून त्यात चिंचोळी रस्त्यावर पावसाळ्यात खोदकामाने रहिवासी त्रस्त झाले आहेत. महावितरणाने ही विजेची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are shocked by lightning strike during rainy season navi mumbai tmb 01
First published on: 13-09-2022 at 10:48 IST