नवी मुंबई : मोठ्या नेत्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची लोकांना जमवण्यासाठी पळापळ होत असते. आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स्वतःहून अनेक जण स्थानिक नेत्याला विचारणा करीत आहेत.

शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात अटल सेतूचे उदघाटन पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याचबरोबर उरण लोकल सेवा लोकार्पण केले जाणार आहे आणि त्या नंतर मोदी यांची सभा आयोजित केली गेली आहे. यासाठी मुख्य जबाबदारी पनवेल आणि उरणच्या आमदारांच्या खांद्यावर असली तरी नवी मुंबई परिसरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर छोट्या-मोठ्या जवाबदाऱ्या आहेत. त्याच अनुशंगाने आपापल्या परिसरातील नागरिकांना सभास्थळी येण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळणारच, पुत्र अतुल पाटील यांना विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत माहिती देताना माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सांगितले की, एक बस आणि पाच सहा कार असे आम्ही जाणार आहोत. यावेळी परिसरातील नागरिक स्वतःहून गाडीत जागा आहे का? अशी विचारणा करीत आहेत. आम्ही केलेली बस कालच फुल झाली आता लोकांच्या आग्रहास्तव दुसरीची शोधाशोध सुरू आहे. असेही जाधव यांनी सांगितले. नवी मुंबईतून किमान १०० बस आणि तेवढ्याच कार चाकी गाड्या जाण्याची शक्यता आहे.