नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, येथे सोमवारी ( ६ नोव्हेंबर) फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे. सदर दिवशी स्टेडियमला येणारे खेळाडू व महत्वाच्या व्यक्तींचा जाण्याचा व येण्याचा मार्ग स्टेडियम नजिकच्या भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा रस्त्याचा वापर होणार आहे.

आणखी वाचा-उरण- खारकोपर लोकलचा दिवाळी मुहूर्त ही हुकणार? उरणचे प्रवासी पाहताहेत उदघाटनाची वाट

या सेवा रस्त्यावर  सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतुक कोंडी होवू नये याकरीता नागरिकांच्या वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे ६ नोहेंबरला सकाळी ०७:०० ते रात्री  २४:०० वा. पर्यंत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम नजिकचा भिमाशंकर सोसायटी ते एल. पी. रिक्षा स्टॅण्ड या दरम्यानच्या सेवा रस्त्यावर वाहनांना ये-जा करण्यास व वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत करण्यात आली आहे. याला पर्यायी मार्ग हा  शीव  (सायन)-पनवेल हायवे रस्त्यावरील  उरण फाटा ते एल. पी. उड्डाणपूल दरम्यानच्या रस्त्याने इच्छित स्थळी जातील. सदरची अधिसूचना अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका तसेच  फुटबॉल व्यवस्थापनाचे अधिकृत पास धारकांची वाहने यांना लागू असणार नाही..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.