नवी मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य नाही. परंतु मुंबईच्या नजीकच असलेल्या रायगड महानगर क्षेत्रात अद्याप ५० टक्के जागा मोकळी असून त्या ठिकाणी परवडणारी घरे देणे शक्य आहे. नवी मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळामुळे आगामी काळात पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्यास तीन वर्षांत महाराष्ट्राचे उत्पन्न दुपटीने वाढणार आहे. या भागात वेगवान पायाभूत सुविधा निर्माण केल्यास हैदराबाद व बंगळुरू या ठिकाणी असलेले ‘आयटी हब’ही रायगडमध्ये येऊन महाराष्ट्रातील व देशातील युवा पिढी परदेशात जाण्याऐवजी ती रायगड महानगर क्षेत्रात आयटीसाठी स्थिरावणार आहे.

याच नवी मुंबई रायगड भागांतून पर्यटक हा गोव्याला जातोय, परंतु या ठिकाणी भौतिक सुविधा दिल्यास हेच पर्यटक रायगड अलिबाग येथे स्थिरावणार आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या क्षेत्राला आगामी काळात मोठे महत्त्व येणार असल्याचे हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले.

Sangli, Evacuation, flood, Krishna,
सांगली : पूरबाधित भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू; कृष्णा, वारणा पात्राबाहेर
Sangli, water level, flood affected areas,
सांगली : पाणी पातळी वाढल्याने पूरबाधित क्षेत्रात स्थलांतराचे आवाहन
Kolhapur, Rain, Radhanagari dam,
कोल्हापूर : पाऊस – रविवार समीकरण कायम; राधानगरी धरण काठोकाठ
Nagpur mahavitaran marathi news
Nagpur Rain News: पावसाच्या तडाख्यात विजेचा लपंडाव; बेसा परिसरातील उपकेंद्रात शिरले पाणी
Malad, Malad Manori Roads, Malad Manori Roads in Poor Condition, Mira Bhayander Municipal Corporation Bus Service, bmc, Mumbai municipal corporation, Mumbai news, marathi news, loksatta news, latest news,
मनोरीतल्या रस्त्यांची दुरवस्था, मीरा भाईंदर पालिकेच्या बसचालकांची मुंबई महापालिकेविरोधात तक्रार
Panvel Municipal Administration, First Traffic Regulation Park in Kharghar, road Safety Education, panvel, Kharghar, Kharghar news, panvel news, latest news, marathi news
खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान
Why is the ancient Banganga Lake in Mumbai so important What is the controversy of its beautification
मुंबईतील प्राचीन बाणगंगा तलावाला इतके महत्त्व का? त्याच्या सुशोभीकरणाचा वाद काय आहे?
When will Security Guards Wardens get Raincoats in Panvel
पनवेलमधील सुरक्षा रक्षकांना, वार्डनला पावसाळी रेनकोट कधी मिळणार

राज्यातील औद्योगिक उत्पादनाच्या २५ टक्के वाट याच रायगड महानगर क्षेत्रातून जातो. तर परदेशात आवक जावक होते, त्यात ४० टक्के वाटा याच रायगड महानगर क्षेत्रातून जातो. तर जेएनपीटी बंदराचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामुळे रायगडचे भविष्य उज्ज्वल आहे. आगामी काळात पाच टाऊनशिप विकसित करायला हव्यात. त्यामुळे रायगडला देशात वेगळे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे मत हिरानंदानी यांनी अधोरेखित केले आहे.