नवी मुंबई : नवी मुंबईत करोनामुक्तीच्या दरातही वाढ झाली आहे. आजवर सहा हजारांहून अधिक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवार, १५ जुलै रोजी करोनामुक्तीचा दर ६२ टक्क्यांवर पोहोचला.
करोनातून बरे झालेल्यांची संख्या सहा हजारांहून अधिक आहे. शहरात ज्या भागामध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना आखल्या जात आहेत.
नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली आणि तुर्भे परिसरातील काही भागांत रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. तत्कालीन पालिका आयुक्त मिसाळ यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. परंतु त्या तोकडय़ा पडल्याचे स्पष्ट झाले. प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्याने त्यांची बदली करण्यात आलेली असताना दुसरीकडे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनाही मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.
आजवर..
* आजचे नवे रुग्ण : ३५६
* एकूण रुग्ण—१०,२७३
* करोनामुक्त रुग्ण—६,३५०
* करोनामुक्तीचा दर— ५ जुलै रोजी ५७ टक्के
* १५ जुलै रोजी करोनामुक्तीचा दर — ६२ टक्के
