नवी मुंबई : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीचा समावेश करण्यात आला आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीमुळे पेशींची रोगप्रतिकार क्षमता वाढणार असून थेट स्नायूमध्ये इंजेक्शन न देताच ही लस सुरक्षा प्रदान करणार आहे. सध्या राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि ६० वर्षावरील नागरिकांना सहव्याधी असल्याने ते अतीजोखमीचे असल्यामुळे प्रथमतः या वयोगटातील नागरिकांना प्रिकॉशन डोस सुरू करण्यात येत आहे.

कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६ महिने पूर्ण झालेले लाभार्थी या प्रिकॉशन डोसकरिता पात्र असतील. या लसीचे डोस महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत देण्यात येतील. सदर प्रिकॉशन डोस घेण्याकरिता दुसरा डोस घेतल्याचा पुरावा तसेच ६० वर्षांवरील नागरिक असल्याबाबतचा योग्य पुरावा असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – “त्या” कथित मद्यपी स्कुल बस चालकाची रिक्षाला धडक, रिक्षाचालकावर शिवीगाळ प्रकरणी केला गुन्हा दाखल 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुराव्यांमध्ये कार्यालयीन ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकॉर्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. तरी दुसरा डोस घेऊन ६ महिने पूर्ण झालेल्या ६० वर्षांवरील नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेऊन कोविड संरक्षित व्हावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.