नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान विविध योजना घोषित करतात. परंतु एकीकडे महागाई वाढतच असून शेतकऱ्यांसाठीच्या योजना फसव्या असतात. पीक विमा योजना राबवितात तर दुसरीकडे डीएपी खताच्या पोत्याच्या किमती भरमसाठ वाढवतात. त्यामुळे देशातल्या शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना म्हणजे पंतप्रधानांची मान्यताप्राप्त मटका योजना आहे असा आरोप आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रंग राचुरे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभागीय आप  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.  दिल्लीच्या आपच्या आमदार आतीशी सिंह, आमदार कुलदीप कुमार राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती मेनन व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. आप महाराष्ट्र ,कोकण विभागातर्फे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी क्षेत्रातील स्थानीय स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकत्यांचा  मेळावा संपन्न झाला. ह्या मेळाव्यात वरील सर्वच क्षेत्रातील सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. आप नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ध्ये विशेष उत्साह होता.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop insurance yojana is prime minister approved matka yojana aap maharashtra president rang rachure ysh
First published on: 08-01-2023 at 21:21 IST