नवी मुंबई : टोळी गुंडांशी झालेल्या चकमकी आणि टोळी युद्ध बंद करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या धोरणामुळे आज आम्हाला कायमस्वरूपी सुरक्षित आणि शांत मुंबई दिसत आहे. या पुस्तकात एमसीओसीए अर्थात महाराष्ट्र ऑर्गनाईज क्रइमी कंट्रोल ऍक्ट (संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा) याबाबत विस्तुत माहिती देण्यात आली . असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी काढले आहेत. वाशीतील मराठी साहित्य परिषद नाट्य मंदिरात त्यांनी लिहलेल्या “द ब्रम्हास्त्र अनलिस्टेड ” या पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तकाचे लवकरच हिंदी आणि मराठीत आवृत्ती निघणार आहेत.
मुंबईत ८० , ९० च्या दशकात गुन्हेगारांच्या टोळ्यांनी थैमान घातले होते. यात कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे अतिशय कठीण असल्याचे तत्कालीन सरकारच्या लक्षात आले होते. मुंबईत असणाऱ्या अनेक टोळ्यांच्या आपसातील युद्धात अनेक निरपराध माणसे मारली जात होती. श्रीमंत व्यक्ती खंडणीत हैराण झाले होते. सिने जगात वेठीस धरले गेले होते. आणि पोलीस काहीसे हतबल असल्याचे चित्र होते. अशातच सरकारने ने संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा निर्माण केला. त्या नंतर मुंबईतील अनेक गुंडांना यमसदनी धाडण्यात आले. आणि हळू हळू मुंबईतील संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले. याच कायद्याचा उहापोह आणि तत्कालीन परिस्थिती यावर माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी “द ब्रम्हास्त्र अनलिस्टेड ” हे पुस्तक लिहले आहे.
विशेष म्हणजे याच काळात त्यांनी आपले कर्तव्य बजावलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी वाशीत करण्यात आले. यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सहित नवी मुंबई पोलीस दलातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी तसेच माजी अधिकारीही उपस्थित होते.
आपल्या पुस्तकाबाबत शिवानंदन यांनी म्हटले कि मुंबईतील संघटित गुन्हेगारीने उचांक गाठला होता. मात्र संघटित गुन्हेगार प्रतिबंधक कायदा लागू झाल्याने त्यावर नियंत्रण मिळवले गेले. याबाबत त्यांच्या एका मित्राचे आणि त्यांचे झालेल्या संवादाचा किस्सा त्यांनी इथे नमूद केला एन्काउंटर मुळे मुंबईतील टोळी युद्धाला लगाम बसला असे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी म्हटले होते. वास्तविक मुंबई आणि जॉर्ज बुश यांचा संबंध नाही. असेही हा किस्सा सांगताना शिवानंदन यांनी स्पष्ट केले. त्या काळी मी पोलीस कर्तव्य बजावत होते. मात्र या पुस्तकात मी माझया बद्दल नाही तर नाही तर मुंबई पोलिसांच्या शौर्य बाबत लिहण्यात आलेले आहे. आणि हे लिखाण कल्पित नसून अस्सल आहे असा दावाही त्यांनी केला.
कार्यक्रम झाल्या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी या पुस्तकात २६/११ च्या हल्ल्याबाबत काही लिहण्यात आले नाही अशी विचारणा केल्यावर आपण लवकरच २६/११ हल्ल्याबाबत नवीन पुस्तक लिह्ण्याच्या विचारात आहोत असे त्यांनी सांगितले. या शिवाय “द ब्रम्हास्त्र अनलिस्टेड ” या इंग्रजी भाषेतील पुस्तकाची लवकरच हिंदी आणि मराठी अनुवाद केलेली आवृत्ती निघणार आहे असेही त्यांनी सांगितले. तर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिसांनी लिहलेल्या अशा अनुभव पुस्तकाने नव्याने दाखल झालेले पोलीस अधिकारी आणि सामान्य जणांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली.