नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी विस्कटलेली घडी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणाम हवा असेल तर  आपल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्यांना चांगले सकारात्मक  वातावरण देणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्या अडचणीही समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून एक कुटुंब म्हणून सर्वच जण उत्तम काम करतील. या उद्देशाने मंगळवारी दरबार भरवण्यात येणार आहे.

हेही वाचा- पनवेल : धक्कादायक! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून, उलवे येथील घटना

या दरबारात चतुर्थ श्रेणी ते उच्च पदस्थ असे सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी आपल्या अडचणी थेट आयुक्तांच्या समोर मांडणार आहेत. त्यांच्या कामकाजाशी संबंधित समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या उद्देशाने हा दरबार घेतला जाणार आहे. हा उपक्रम आयुक्त भांबरे यांच्या कल्पनेतून साकारला जाणार असून  सर्वसामान्यांप्रमाणेच पोलिसांच्या देखील समस्या सोडवण्यावर भर दिला जात आहे.  इतर अनेक खात्या प्रमाणे पोलीस खात्यातही वरिष्ठांच्यापर्यंत समस्या अडचणी मधली फळी पोहचू देत नाही. त्यामुळे अशा अडचणींचा सामना करताना अधिकारी कामरचारी आपली उत्तम सेवा देऊ शकत नाही आणि आयुक्त दर्जाच्या अधिकार्या पर्यंत नेमकी अडचण येत नाही परिणामी रिझल्ट उत्तम लागत नाही.

हेही वाचा- “खोके सरकार अल्पायुशीच, वादग्रस्त विधाने करून मूळ प्रश्नांपासून भटकवणारे सरकार”, आदित्य ठाकरेंचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता थेट आयुक्तांच्या समोरच आपल्या समस्या मांडता येणार असल्याने नवी मुंबई पोलीस विभागात विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून अनेकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.  हा दरबार मंगळवारी कलंबोलीतील मुख्यालय सभागृहात भरणार आहे यात प्राथमिक माहिती नुसार साडेपचशेच्या आसपास अधिकारी कर्मचारी अडचणी मांडणार आहेत.