नवी मुंबई : शीव पनवेल मार्गावर वाशी सानपाडाच्या सीमेवर असणाऱ्या एका उद्यानात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास समोर आली असून, सानपाडा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : ध्वनी प्रदुषण प्रकरणी भारतीय कंटेनर निगमवर कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने बजावली कारणे दाखवा नोटीस

हेही वाचा – नात्याला काळीमा! खाटीक पित्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सानपाडा आणि वाशीच्या सीमेवर एक उद्यान असून, त्या ठिकाणी जॉगार्स पार्कही आहे. तर शेजारी मलनिस्सारण केंद्र आहे. असे असले तरी या परिसरात मानवी वावर फारच कमी असून, दुपारच्या वेळी हे ठिकाण पूर्ण निर्जन असते. याच ठिकाणी एका झाडाखाली एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत सानपाडा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील वाघ आणि पथक या ठिकाणी रवाना झाले. मृत महिलेजवळ एक गाठोडे आढळून आले असून, त्यात काही कागदपत्रे सापडली आहे. मात्र तिची ओळख पटेल असे काही आढळून आलेले नाही. एखाद्या पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता होण्याची नोंद असेल या शक्यतेने नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ असून तिने साडी घातलेली आहे.