उरण येथील चारफाट्यावर तयार करण्यात आलेल्या चौकात विविध प्रकारचे मोठं मोठे फलक लावण्यात येत आहेत. चौकातील फलकामुळे वाहन चालकांना समोरील वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणच्या चौकातील असे बेकायदा व अपघाताला कारणीभूत ठरणारे फलक हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. याच चौकात दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ही झाला होता.

हेही वाचा- नवी मुंबई : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे किरीट सोमय्यांना साकडे; सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

चारफाटा चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे वारंवार मागणी केल्यानंतर सिडकोने उरणच्या चारफाटा येथील चौकाचे रुंदीकरण केले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, या चौकात मोठं मोठे फलक लावले जात आहेत. त्यामुळे अचानक वाहने एकमेकांसमोर येतात आणि अपघात होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या फलकांवर सिडकोने कारवाई करण्याची मागणी वाहनचालकाकडून केली जात आहे.