dilip vengsarkar singer sagar mhatre brand ambassador swachh survekshan 2022 panvel municipal corporation zws 70 | Loksatta

पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे

. या वर्षीच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमे अंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे

पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी दिलीप वेंगसरकर आणि गायक सागर म्हात्रे
क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम स्थान मिळविण्यासाठी पालिका प्रशासक तथा आयुक्तानी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या असून पालिकेच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमेच्या जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरपदी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. शहर स्वच्छ रहावे , नागरिकांना स्वच्छतेची सवय व्हावी, घन कचरा व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने व्हावे, शौचालयांची स्वच्छता अशा अनेक कार्यक्रमांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाच्यावतीने‘स्वच्छ भारत’हे अभियान राबविले जाते.

हेही वाचा >>> वाशी : गाळा मालकांचा महावितरणवर धडक मोर्चा

पनवेल महानगरपालिका सातत्याने ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षणामध्ये अग्रक्रम गाठीत आहे. यावर्षीही  स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेमध्ये पालिका आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर ३४ शहरांमध्ये पनवेल महानगरपालिकेला ५ वा क्रमांक मिळवता आला आहे .तसेच देशपातळीवर 382 शहरांमध्ये 17 वा क्रमांक पालिकेने पटकावला आहे. याचबरोबर कचरामुक्त शहरांसाठीचे  ३ स्टार व हागणदारी मुक्त शहराचा ODF++ दर्जा पालिकेला प्राप्त आहे. 

हेही वाचा >>> उरण मध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात

पुढीलवर्षी  यावर्षीपेक्षा अधिक चांगले यश महापालिकेस मिळावे यासाठी महापालिका प्रयत्न करत असून तरुणाईच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या आयुक्तांनी क्रीकेटवीर वेंगसरकर आणि गायक म्हात्रे यांची साथ घेतली आहे. या वर्षीच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमे अंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘स्वच्छता के दो रंग हरा गिला, सुखा निला’या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबत पनवेलकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉलचे गायक सागर म्हात्रे यांच्या खांद्यावर आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-10-2022 at 20:28 IST
Next Story
वाशी : गाळा मालकांचा महावितरणवर धडक मोर्चा