उरणमध्ये द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशने शनिवारी जेएनपीटी कामगार वसाहतीच्या कर्मचारी क्लबमध्ये ‘चला घडवू खेळांचे उरण’ या सामाजिक जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. उरणमधील तरुण खेळासाठी उत्साहाने सहभागी व्हावे या उद्देशाने पुढील महिनाभर हे जनजागरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा- उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी राहुल इंगळे यांची नियुक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, गोपाळ पाटील,राजा पडते, एल.बी.पाटील आदीनी मार्गदर्शन केले. उरणमध्ये द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या वतीने २२ वर्षापासून उरणमध्ये विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय स्पर्धा भरविण्यात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरणमधील तरुण खेळासाठी उत्साहाने सहभागी व्हावे या उद्देशाने पुढील महिनाभर हे जनजागरण करण्यात येणार आहे. यावेळी उरण सारख्या विकसित होणाऱ्या शहरात खेळाचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना सरावासाठी नवी मुंबई किंवा मुंबईत जावे लागत आहे. मात्र तरीही उरणमधील अनेक खेळाडूंनी खेळातील आपले कौशल्य सिध्द केले आहे. त्यासाठी उरणमध्ये जागर भरविण्यात आला आहे.