नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते, परंतु शुक्रवारी घाऊक बाजारात कांदा वधारला आहे. प्रतिकिलो मागे दरात कमीत कमी ३ रु ते जास्तीत जास्त ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी बाजारात पावसामुळे आवक कमी झाली असून सर्वच बाजारात कांदा वधारला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एपीएमसीत कांद्याचे दर स्थिर होते. परंतू शुक्रवारी बाजारात आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात. पावसाळ्याआधी ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यांत आणि त्यांनंतर ही दर वधारतात. त्यामुळे पावसाळापूर्व तयारी म्हणून ठेवणीचे कांदे साठवणुक करण्यास सुरुवात होते.

हेही वाचा… बाजारात मक्याच्या हंगामाला विलंब

मात्र यंदा बाजारात अवकाळी पावसामुळे साठवणूकीचे कांदे भिजल्याने दर्जा घसरला होता. त्यामुळे मे महिन्यात ठेवणीतल्या कांदा खरेदीला ग्राहकांची मागणी रोडावली होती. एपीएमसीत शुक्रवारी ७८ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो ३ ते ५ रुपयांनी दरवाढ झाली असून सर्वात उच्चतम प्रतिचा कांदा आधी १३-१५रुपयांनी उपलब्ध आता १६-२० रुपयांनी विक्री होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएमसी बाजारात शुक्रवारी कांद्याची आवक कमी झाली आहे, तसेच सर्वच बाजारात कांद्याचे दर वाढले असल्याने एपीएमसीत ही कांद्याची दरवाढ झाली आहे. – महेश राऊत, व्यापारी, कांदा बटाटा बाजार समिती