पनवेल: पनवेल महापालिकेमध्ये नूकतेच ३७७ पदांकरीता भरती प्रक्रीया पार पडली. मात्र सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांची फसवणूक करण्याचे प्रमाण सूरुच आहेत. महापालिकेचे नाव वापरुन एकाने पर्यवेक्षक संगणक ऑपरेटर या पदासाठी अभिनव उत्तम शिंदे या उमेदवारांना खोटे प्रस्ताव पत्र (ऑफर लेटर) दिल्याने एकच खळबळ माजली. ३१ मे रोजी हे पत्र समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर पनवेल महापालिकेने या पत्राची दखल घेत संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात पनवेल शहर पोलीसांना या प्रकरणी लक्ष घालून फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे. संबंधित अनोळखी व्यक्तीने नोकरीची गरज असणा-या अनेक गरजूंची खोट्या पत्राव्दारे पैसे उकळले असून त्यांची फसवणूक केल्याचा संशय पालिकेने पोलीसांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

हेही वाचा : एनएमएमटीने बस फेऱ्या वाढवाव्यात, उलवेकरांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेने मागील वर्षी ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता ऑनलाईन परिक्षा घेतल्यानंतर एकही गैरव्यवहार झाला नसल्याची आणि पारदर्शकतेने भरती प्रक्रिया झाल्याचा दावा केला होता. या परिक्षेत प्राप्त गुणानुक्रम, प्रवर्गनिहाय, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सुची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर परिक्षातील उत्तीर्ण व निवड झालेल्या उमेदवारांना १५ मार्चला नियुक्ती आदेश दिले होते. लोकसभेच्या निवडणूकीच्या आचार संहितेमुळे १६ मार्चपासुन या भरती प्रक्रियेला स्थगित करण्यात आली होती. या घटनेनंतर पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक झाली असून पालिकेने परिक्षेनंतर प्रसिध्द केलेल्या निवडसुचीतील परीक्षार्थींनी त्यांच्या नावाचा समावेश सूचीमध्ये असल्याची खात्री महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर करावी. तसेच खोट्या प्रलोभनाला बळी पडु नये असे आवाहन केले आहे .