मद्यपी मुलाच्या मारहाणीला विरोध करण्यासाठी ८० वर्षीय पित्याने उगारलेल्या घरातील स्वयंपाक घरातील चाकू हल्ल्यात मुलगा ठार झाल्याची घटना सोमवार दुपारी कामोठे येथील सेक्टर ६ मधील आनंदसरोवर सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी पित्याला अटक करण्यात आली आहे.
शंकर होलिया असे या संशयित आरोपी असलेल्या पित्याचे नाव आहे. रस्त्यावर कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या शंकर यांचा राहुल हा ३८ वर्षांचा मुलगा बेकार असून दारू पिऊन रोज घरातल्यांना त्रास द्यायचा. सोमवारी राहुल व पिता शंकर यांच्यात भांडण झाले. राहुलने वडिलांवर वरवंटाने हल्ला केला असता, त्याला रोखण्यासाठी शंकर यांनी शेजारच्या स्वयंपाकघरातील चाकूने राहुलच्या मानेवर वार केला, अशी माहिती राहुलच्या बहिणीने कामोठे पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी तीन आसनी रिक्षातून रक्तबंबाळ राहुलला नेऊन रुग्णालयात दाखल केले.
सुरुवातीला शंकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारांदरम्यान राहुलचा मृत्यू झाल्याने शंकरविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. सध्या न्यायालयाने शंकर यांना न्यायालयीन कोठडी सूनावली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2016 रोजी प्रकाशित
कामोठेत मुलाच्या खूनप्रकरणी पिता कारागृहात
उपचारांदरम्यान राहुलचा मृत्यू झाल्याने शंकरविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 25-03-2016 at 01:00 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father sent jail for killing his son