पनवेल: सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील मात्र दुचाकीवरुन इतर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी एका चोर महिलेने खेचण्याची पहिलीच घटना नवी मुंबईतील खारघर वसाहतीमध्ये घडली आहे. यापूर्वी रस्त्यावरुन पायी चालणा-या महिलांना दुचाकीवरील संशयित मुलांकडून सोनसाखळी हिसकावण्याची भिती होती. या घटनेमुळे दुचाकीवरुन मागच्या सीटवर बसलेली संशयित तरुणी चोर तर नाही ना, असा प्रश्न सोन्याचे दागिने घालून पायी चालणा-या महिलांना पडला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील मेट्रो रेल्वे सेवा सुरू केली. याच रेल्वे प्रवासातून प्रवास करुन घरी पायी चालत असताना ४० वर्षीय महिलेला हा थरारक अनुभव आला आहे. खारघर वसाहतीमधील एका शिकवणीवर्गात पिडीत महिला शिकवणी घेऊन मेट्रोच्या सेंट्रलपार्क स्थानकातून पेठपाडा या स्थानकात उतरल्यानंतर पायी चालत असताना दुचाकीवर मागील सीटवर बससेल्या लाल रंगाची कुर्ती आणि पांढ-या रंगाची ओढणी घेतलेल्या महिलेने पिडीतेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून तेथून पळ काढला. याबाबत रितसर तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ज्या दुचाकीवरुन चोरी केली ती दुचाकी काळ्या रंगाची होती. पिडीतेचे ८ ग्रॅम सोनसाखळी चोरट्या महिलेने पळविल्याने खारघर पोलीस संशयित महिला व दुचाकी चालविणा-या चोरट्याचा शोध घेत आहे.

हेही वाचा…. तीन बांगलादेशी नागरिकांना पनवेलमधून ताब्यात घेतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मागील दोन वर्षात (२०२१, २०२२) २५५ सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडल्या. यामधील १०५ चोरीच्या घटना उघडकीस पोलीस आणू शकले. उर्वरीत घटनांतील चोर अजूनही फरार आहेत.