नवी मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाची बस क्रमांक १५ ला बेलापूर इथे आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.उपलब्ध अग्नीशमन उपकरणांच्या सहाय्याने घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसंच नवी मुंबई अग्नीशमन दलाचे कर्मचारी काही मिनीटात दाखल होत त्यांनी आग पुर्णपणे विझवली, त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले नाही.

हेही वाचा… मद्यधुंद अवस्थेत स्कूल बस चालवणारा गजाआड; सुदैवाने चाळीस विद्यार्थी सुरक्षित

हेही वाचा… नवी मुंबई महापालिकेचा कचरा वाहतूक व संकलनासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस ही बेलापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी पोहचल्यावर बसचे कर्मचारीही आणि सर्व प्रवासी हे बसमधून उतरले.त्यावेळी बसच्या स्टीअरिंग व्हिलच्या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.