लोकसत्ता टीम

नवी मुंबई: मुंबई कृषि उत्पन्न फळ बाजारात सध्या हापुस आंब्याचा हंगाम सुरू असून ,या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाची आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्यात येते. यंदाही अन्न व औषध प्रशासनाने ३ अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले असून हे पथक, बाजारातील आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर नजर ठेवून आहे. दोन ठिकाणचे नमुने तपासणी साठी नेण्यात आले असून आद्यप त्याचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. मात्र दरम्यान कोणतीही अपायकारक घटना आढळलेली नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?

एप्रिल- मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर हापूस तसेच इतर आंब्यांचा हंगाम सुरू होतो. यावेळी काही आंबा व्यापारी, विक्रेते हे आंबा लवकर पिकवण्यासाठी घातक रसायन कॅल्शियम कार्बाइड , अतिरिक्त इथिलिनचा वापर करून लवकर पिकवले जातात. आंबा तयार करण्यासाठी इथिलीनचा वापर किती करावा याची मात्रा ठरवलेली असते. अतिरिक्त इथिलीनचा वापर केल्यास ते आरोग्याला हानिकारक होते. ऐका पेटीत इथिलीनच्या २-३ पुड्या ठेवण्यास परवानगी आहे. तसेच कॅल्शियम कार्बाइडने कर्करोग रोग होऊ शकतो.

यंदा हवामान बदलाने, अवकाळी पावसाने हापुसला पोषक वातावरण उपलब्ध होत नल्सयाने आंबा बागायतदार वेळे आधीच आंब्याची तोडणी करीत आहेत. त्यामुळे बाजारात आकाराने लहान व परिपकव्व आंबा दाखल होत नाहीये. वेळेच्या आठवडाभर आधीच आंबा दाखल होत असल्याने आंबा तयार होण्यास बराच कालावधी लोटत आहे. अशावेळी काही व्यापारी कमी वेळेत आंबा पिकविण्याची प्रक्रिया लवकर व्हावी याकरीता बाजारात अतिरिक्त रसायनांचा वापर केला जातो. दरवर्षी एपीएमसी फळ बाजारात आंबा हंगामात जवळ जवळ १० ते १५ जणांवर कारवाईची नोंद असते. मात्र यंदा अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणचे नमुने तपासणीसाठी नेले असून , त्याचा अहवाल येण्यास अद्याप बाकी आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असून याठिकाणी गस्तीसाठी पथक नेमण्यात आले आहे. मागील ८-१० दिवसांपूर्वी दोन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. परंतु या दरम्यानच्या कलावधीत कोणतीही अपायकारक घटना आढळलेली नाही. -योगेश डहाणे, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन