पनवेल : देश व राज्याचा अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार असून राज्य शासनाने अर्थसंकल्पातील सर्वाधिक मोठी आर्थिक तरतूद आरोग्य व शिक्षणावर करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली.
खारघर येथील सेक्टर १० मधील भारती विद्यापीठ आणि मेडीकव्हर रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासगी रुग्णालयातील वैद्याकीय सेवा न परवडणारी असल्याने सामान्यांना परवडणारी वैद्याकीय सेवा मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करावेत अशी मनीषा माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळय़ातील समारंभाच्या व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही चव्हाण यांच्या मागणीला दुजोरा देत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील पाच लाख रुपये आणि राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दोन लाख रुपयांच्या वैद्याकीय विम्याची क्षमता वाढविण्याचे संकेत यावेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल-शीव महामार्गावरील खारघर वसाहतीमधील सेक्टर १० येथील भव्य भूखंडावर भारती विद्याापीठ समूहाने युरोपच्या मेडीकव्हर समूहाशी भागीदारी करत भव्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारती विद्यापीठ समूहाचे कौतुक करताना मेडीकव्हर समूहासोबत केलेल्या भागीदारीमुळे युरोप खंडातील वैद्याकीय सरावाची शिस्तबद्धता राज्यातील रुग्णांना अनुभवता येईल असे यावेळी सांगितले.
तसेच देशात डॉक्टरांची कमतरता आणि मोठय़ा रुग्णसंख्येमुळे सरकारी वैद्यकीय व्यवस्था तोकडी पडत असल्याकडे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी लक्ष वेधले. त्यामुळे देशात वैद्याकीय सेवेत शॉर्टकर्ट मारले जात असून युरोपीय देशांतील वैद्याकीय सेवेतील शिस्तीची सवय देशातील इतर वैद्याकीय सेवा पुरविणाऱ्यांना लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief minister prithviraj chavan demand that government expenditure should be spent on health and education amy
First published on: 24-01-2023 at 00:25 IST