“छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे सर्व लोकांना स्वतःबरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. त्याप्रमाणे राजकीय पक्षाचाही कारभार चालला पाहीजे. पक्षात कुणावरही अन्याय होता कामा नये. महेश जाधव यांच्याबरोबर जे झालं, ते ऐकून वाईट वाटलं. एखादा कार्यकर्ता पक्षात काम करत असताना नेत्यांनी कार्यकर्त्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहीजेत. एखादा कार्यकर्ता तळमळीने काम करत असतो, कामगारांचे प्रश्न सोडवत असतो. अशावेळी जर त्या कार्यकर्त्याला काम करण्यापासून रोखले तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचं काय होईल? याचाही विचार केला पाहीजे”, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त केली. या मेळाव्यात मनसेचे माजी कामगार नेते महेश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महेश जाधव यांना मनसेत असताना मारहाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष राहिलेल्या महेश जाधव यांनी ९ जानेवारी रोजी अमित ठाकरे आणि इतरांवर गंभीर आरोप केले होते. तोंडातून रक्त निघालेले असताना महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांना मारहाण झाली असल्याचा दावा केला होता. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्यातील फोनद्वारे झालेल्या संभाषणाची एक तथाकथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
Rohit Pawar, crab
आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी

अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप, मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त, सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, नेमकं प्रकरण काय?

आमचा पक्ष कार्यकर्त्याला न्याय देणारा

आज महेश जाधव राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी ‘नमक हराम’ या चित्रपटाचा दाखला देऊन, त्यातही असेच झाले असल्याचे सांगितले. “महेश जाधव हा गोदी कामगाराचा सुपूत्र असल्यामुळे कुठल्याही कामगारावर अन्याय होऊ द्यायचा नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, याची तयारी महेश जाधव यांनी ठेवली आहे. २३ वर्ष ते ज्या पक्षात काम करत होते, तो सोडून ते राष्ट्रवादीत येत आहे. मी त्यांचे स्वागत करतो”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

“अमित ठाकरेंकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न”, जखमी मनसे पदाधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल, संदीप देशपांडे म्हणाले…

.. म्हणून महेश जाधव यांना मारहाण

दरम्यान महेश जाधव यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. महेश जाधव यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. “अमित ठाकरेंकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. कामगारांची फसवणूक करणे, कामगारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे यांनी बोलावलं होतं. परंतु, जाधव काही कामगारांना घेऊन तिथे गेले आणि अमित ठाकरे यांना उलटसुलट उत्तरं देऊ लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सैनिक संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली”, अशी माहिती देशपांडे यांनी दिली होती.