नवी मुंबई : कारागृह अधिकारी असल्याची बतावणी करीत एकाची २३ लाखांची पसवणूक करण्यात आल्याचे प्रकरणी उघडकीस आले आहे. ही फसवणूक करणाऱ्या या बोगस अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. तुरुंगात लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून देता असे सांगून ही फसवणूक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवीण कांबळे आणि सुजाता कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. भास्कर चिचूलकर यांची फसवणूक झाली आहे. प्रवीण आणि भास्कर यांची ओळख होती. प्रवीण यांनी आपण तळोजा कारागृहात सहाय्यक निरीक्षक असल्याची ओळख करून दिली होती. काही दिवसांनी ठाणे कारागृहात पाण्यासह अन्य वस्तूंचा पुरवठा करण्याच्या निविदा निघणार आहेत. तुमची इच्छा असेल तर काम करून देतो असे प्रवीण याने भास्कर यांना सांगितले.  हा व्यवहार डी आय इंटरप्राइजेस या कंपनीमार्फत होणार असल्याचे सांगत अनामत रक्कम म्हणून २३ लाख रुपये घेतले. ही कंपनी सुजाता हिच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले. कंपनीने काही दिवस पाणी पुरवले. नंतर एकूण निविदा निघणार असल्याने सध्या पाणी नको असे सांगण्यात आले. यामुळे भास्कर चिचूलकर यांना शंका आल्याने त्यांनी तळोजा कारागृहात चौकशी केली असता असा कोणी व्यक्ती काम करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी दाम्पत्याने यापूर्वी बेकारी उत्पादन पुरवठादाराचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर कामोठे पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या हे दाम्पत्य फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud prison officer crime news navi mumbai akp
First published on: 23-10-2020 at 00:53 IST