नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळे व ३५८८४ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.आज अनंत चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन सोहळा पार पडणार आहे.त्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून दुसरीकडे या विसर्जन सोहळ्यावर पावसाचे सावट आहे. या सोहळ्यासाठी शहरातील अनेक ठिकाणची वाहतूक
वळवण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. तर नवी मुंबई महपालिकेकडून हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी नैसर्गिक तलावावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पर्यावरणशील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने १३४ इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रीमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केलेली आहे.

हेही वाचा >>> गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त

nashik market committee auction marathi news
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत
bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

याशिवाय नैसर्गिक २२ विसर्जन स्थळांवरही विसर्जनाच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आलेली असून आज १० दिवसांच्या बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दोन वर्षापासून कडक निर्बंधाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव विसर्जन सोहळा साजरा करण्यात येत असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळनार आहे. पालिकेने २२ मुख्य विसर्जन स्थळांवर सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न व्हावे याकरिता तराफ्यांची तसेच मोठ्या मुर्तींकरिता ट्रॉली व क्रेनची व्यवस्था केली आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळांच्या काठांवर आवश्यक त्या ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आलेले असून ७००पेक्षा अधिक स्वयंसेवक व लाईफगार्ड्स आणि अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई, पनवेल व उरणमधील अवजड वाहतूक शुक्रवारी पहाटेपासून बंद

प्रत्येक ठिकाणी पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी सुविधा मंचही उभारण्यात आले आहेत. या मंचांवर श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याकरिता करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरत असणार आहे.नैसर्गिक व कृत्रिम अशा एकूण १५६ विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत. फळे व प्रसादाचे साहित्य ठेवण्यासाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात आली असून हे प्रसाद साहित्य व फळे गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहेत. विसर्जन स्थळांवर दररोज जमा होणा-या निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती.तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे विसर्जन स्थळांवर होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता शहरात १३४ इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आलेली असून नागरिकांनी नैसर्गिक जलाशयांचे रक्षण करण्यासाठी आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये श्रीमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिक या नावलौकीकात भर घालावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

नैसर्गिक तलावांवर सीसीटीव्हीची नजर…….
एकीकडे पालिकेने विसर्जन तलावांवर गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अत्यंत सुरक्षितपणे विसर्जन पार पाडण्यासाठी नैसर्गिक तलावांवर सरासरी १० याप्रमाणे २२ तलावावर २२० ते २२५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. तलावाजवळ तयार करण्यात आलेल्या पालिकेच्या मंडपात या प्रत्येक तलावाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे.तसेच अचानक वीजव्यवस्था खंडीत झाल्यास छोट्या जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. – सुनील लाड ,कार्यकारी अभियंता विद्युत विभाग, परिमंडळ-१