आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त लावला आहे. हरिहारेश्वरची घटना आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलीस कंट्रोल मध्ये आलेला धमकीचा फोन त्यामुळे ऐन सणात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सदर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खाडी किनारा आणि गणेश विसर्जन मार्ग व स्थळ त्याच बरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था हे सर्व पोलिसांच्या शिरावर आहे नवी मुंबईत सुमारे साडेचार हजार अधिकारी पोलीस असून बंदोबस्तात अडीच हजारापेक्षा अधिक बळ वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या पूर्वीच सर्वांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सागरी सुरक्षेबाबत नवी मुंबई पोलीस अधिक गांभीर्याने पाहत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई, पनवेल व उरणमधील अवजड वाहतूक शुक्रवारी पहाटेपासून बंद

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईवर हल्ला करणारे पाकिस्तानी दहशदवाद्यांनी समुद्र मार्गेच प्रवेश केला होता तर ९३ साखळी बॉम्बस्फोट रसद खाडी मार्गेच आली होती हा इतिहास आणि त्यात हरिहरेश्वर किनाऱ्यापर्यंत आलेली बोट व हल्ल्याची धमकी पाहता खाडी किनाऱ्यावर विशेष काळजी घेतली जात आहे. या साठी अनेक आठवड्या पासून विशेष शाखा उपयुक्त रुपाली अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मच्छीमारांकशी अनेक बैठकीतून संवाद साधण्यात आला आहे.नवी मुंबईत कोपरखैरणे , वाशी आणि सीबीडी या तीन ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता नियमित वाहतुकीसाठी मार्ग बंद केले असून त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> उरण : बोंबील गडगडले ; आवक वाढली मात्र दर घटले

वाहतुकीतील बदल
कोपरखैरणे ब्ल्यू डायमंड चौकातून शबरी हॉटेल वाशी सेक्टर ९ व १६ मार्केट मार्गे छ. शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्ग प्रवेश बंदी घालण्यात आली आहे याला पर्यायी मार्ग ब्ल्यू डायमंड सिग्नल कडून कोपरी चौक- पाम बीच मार्गे अरेंजा कॉर्नर मार्गे पुढे.वाशी प्लाझा सिग्नलकडून छ. संभाजी महाराज चौक ते छ. शिवाजी महाराज चौक मार्गे ब्ल्यू डायमंड चौक हा मार्ग प्रवेश बंद करण्यात येणार असून त्यांना पर्यायी मार्ग म्हणून वाशी प्लाझा चौकातून पाम बीच मार्गे महात्मा फुले भवन चौक अरेंजा कॉर्नर मार्गे कोपरी सिग्नल पासून ब्ल्यू डायमंड असा मार्ग देण्यात आला आहे.
अरेंजा सर्कल  टायटन शो रूम मार्गे छ. शिवाजी महाराज चौक ते नूर मज्जीद बोहरा मज्जीद मार्गे एमटीएनएल चौक जागृतेश्वर मंदिर हा मार्ग बंदी असून पर्यायी मार्ग पामबीच मार्गे सिटीबँक चौक पासून छ.संभाजी महाराज चौक मार्गे पुढे जाता येणार आहे.या शिवाय सीबीडी पोलीस ठाणे हद्दीत कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर १५ कडे जाणारा रस्ता व सेक्टर १५ कडून उड्डाणपुलावरून कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाकडे येणारा रस्ता हा मार्ग गणेश विसर्जन वाहने सोडून अन्य वाहनांना बंदी आहे त्यांना पर्यायी मार्ग दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील मार्ग रेल्वे स्टेशन सेक्टर ११ मार्गे पुढे जाऊ शकता.सदर मार्ग बदल हे शुक्रवारी सकाळी १० पासून ते शनिवारी सकाळी गणेश मूर्ती विसर्जन संपेपर्यत करण्यात आलेले आहेत.