खंडणी, हत्या हत्येचा प्रयत्न, बाल लैंगिक अत्याचार, आणि ५ वेळा मकोका अशा गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या विकी देशमुख याने गव्हाण गावात घराशेजारी केलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केली आहे. या घटनेने आता उत्तरप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर कारवाई केली जात असल्याची चर्चा असून त्याची सुरवात नवी मुंबईत झाली आहे.
नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे उरण पनवेल नवी मुंबई परिसरातील जागांचे दर आकाशापेक्षा मोठे झाले आहेत. त्याच मुळे भूमाफियांचे जाळे या परिसरात झाले असून यातील सर्वात मोठे नाव विकी देशमुख याचे घेतले जाते. प्रत्येक विकास प्रकल्पातून खंडणी आणि खंडणीतून टोळी चालवणे व त्याद्वारे दहशद पसरविणे हे चक्र सुरु केले होते. यामुळे कमी कालावधीत विकी देशमुख टोळी नावारूपास आली त्याच्या विरोधात विक्की देशमुख वर पाच मोक्काचे गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवाय तीन हत्या , बलात्कार, अपहरण , खंडणी , हत्येचा प्रयत्न बाल लैंगिक अत्याचार, पोलिसांवर गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या तीन हत्येत त्याच्या एका साथीदाराचीही त्याने हत्या केली होती. तत्कालीन गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या सातत्यपूर्ण कारवाईने आता पर्यत त्याचे ८ पेक्षा अधिक लोक अटक असून त्यात त्याच्या काही नातेवाईकांचा समावेश आहे. विक्की देशमुख याने तळोजा कारागृहात मध्ये असताना व्हीआयपी सुविधा देत नसल्याने काही वर्षांपूर्वी तुरुंग अधिकार्यांवर कारागृहाबाहेर साथीदारांकरवी गोळीबार केला होता.
गेल्या अनेक महिन्यापासून गुन्हे शाखेतील जवळपास ५० टक्के पोलीस बळ केवळ विकी देशमुख याचे पाळेमुळे खणून काढण्यात व्यस्त आहेत आणि आज त्याचाच एक भाग म्हणजे उत्तरप्रदेश प्रमाणे त्याच्या घरावर बुलडोझर फिरवणे आहे. आज सकाळी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्या सह हि कारवाई करण्यात आली आहे त्याच्या घराच्या आसपास त्याने बांधलेले सर्व बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आहे. हि कारवाई सिडकोने केली आहे. अशी माहिती अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.