बाजारात ५ हजारहून अधिक पेट्या दाखल, ८० टक्के हापूस आकाराने लहान

वाशीतील एपीएमसी बाजारात हापुसची आवक वाढली असून बाजारभाव उतरले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने शुक्रवारी बाजारात हापुसची आवक ५ हजाराहून अधिक पेट्या दाखल झाल्या आहेत . परंतु हापूसची लवकर तोडणी केल्याने बहुतांशी लहान आकाराचे आंबा बाजारात दाखल होत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती,परंतु दरम्यानच्या कालावधीत हवामान बदलाने उत्पादनाला फटका बसत आहे. काही दिवसांपासून हवामानात उष्मा वाढत आहे.हापुसला जादा उन्हाचा तडखा बसत असून कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत. हापूसला कडक ऊन्ह लागत असून त्याचा दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक तोडणी करण्यावर भर देत आहेत. फेब्रुवारी महिन्यात फळांचा राजा आंबा बाजारपेठेचे आकर्षण ठरत असतो.

हेही वाचा >>>नवी मुंबई : राडा रोडा टाकण्याची दादागिरी; अधिकाऱ्यांची गाडी अडवत शिवीगाळ, गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीतील बाजारपेठेत आंबा दाखल होत आहे. मागील दोन आठवड्यापासून रत्नागिरीच्या देवगड हापूस तसेच कर्नाटक, रायगड आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र कडक उन्ह असून वातावरणात उष्मा वाढला आहे.त्याचा फटका हापूसला बसत असून हापूस बागयतदार यांनी परिपक्व होण्याआधीच तोडणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात ८०% लहान तर २०%मोठया आकाराचा आंबा दाखल होत आहे, अशी मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रतिपेटी दरात २ हजार ते ३ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. आधी ४ते ८ डझन पेटीला ३ हजार ते ८ रुपये दराने विक्री होती ती आता ३ हजार ५ हजार ते आणि ६ हजार रुपयांनी विकले जात आहेत.