Navi Mumbai News : नवी मुंबई : नवी मुंबईत रविवार पासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई शहरासह इतर शहरातही पावसाचा जोर आजही कायम असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरातील १८ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर, खबरदारीचा उपाय म्हणून आज देखील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान, नवी मुंबई हद्दीत गेल्या २४ तासांत (१९ ऑगस्ट सकाळी ८.३० ते २० ऑगस्ट सकाळी ८.३० पर्यंत) सरासरी १८८.६३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सर्वाधिक २१६.६० मिमी पाऊस वाशी परिसरात तर किमान १५२.८० मिमी पाऊस दिघा शहरा झाला.
मागील काही दिवसांपासून पावसाने दमदरा हजेरी लावली आहे. रविवारपासूनच या पावसाने जोर धरला आहे. नवी मुंबईसह इतर शहरात पावसाचा जोर आजही कायम आहे. पावसाचा जोर कायम असून शहरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या वाशी, कोपरखैरणे शहरात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच नेरूळ, बेलापूर, ऐरोली, दिघा भागातही पाऊस कोसळत आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत (१९ ऑगस्ट सकाळी ८.३० ते २० ऑगस्ट सकाळी ८.३० पर्यंत) सरासरी १८८.६३ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत सर्वाधिक २१६.६० मिमी पाऊस वाशी परिसरात तर किमान १५२.८० मिमी पाऊस दिघ्यात झाला.
मंगळवारी किती पाऊस ?
काल मंगळवारी, २४ तासांत (१८ ऑगस्ट सकाळी ८.३० ते १९ ऑगस्ट सकाळी ८.३० या कालावधीत) सरासरी १८५.०२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती.
मोरबे धरणाची स्थिती
नवी मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मोरबे धरण परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने मोरबे धरण १०० टक्के भरले आहे. आज बुधवार पहाटे तीन वाजल्यापासून मोरबे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले. यातून ११२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन नवी मुंबई महापालिकेमार्फत देण्यात आले आहे.
भरतीची माहिती
समुद्राच्या भरतीची वेळ :
सकाळी १०.१४ वा. – ४.०२ मीटर
रात्री १०.०३ वा. – ३.४४ मीटर
आज सकाळी १०.१४ वाजता समुद्रात ४.०२ मीटर उंचीची भरती येणार होती. तर रात्री १०. ०३ वाजता ३.४४ मीटर उंचीची भरती होणार असल्याता अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे शहरात १७ झाडे पडली, दोन ठिकाणी आगीचे प्रकार घडले. तर, १८ ठिकाणी पाणी साचले, तसेच एक बचावकार्य आणि एक अपघाताची नोंद झाली.
विभागनिहाय पाऊस
बेलापूर – १९२.२० मिमी
नेरुळ – १९१.६० मिमी
वाशी – २१६.६० मिमी
कोपरखैराणे – २०९.४० मिमी
ऐरोली – १६९.२० मिमी
दिघा – १५२.८० मिमी