शासकीय कार्यालयांना शनिवारी व रविवारी दोन दिवस सुट्टी असते. सोमवार ते शुक्रवार सतत वाहतूक कोंडीमुळे हैराण होणाऱ्या प्रवाशांना आज सायन पनवेल महामार्गावर व वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो. पण आठवडाभरात शनिवारी, रविवारी कामानिमित्त, तसेच नातेवाईकांकडे जाणाऱ्या नागरिकांनाही सर्वत्र आढळणारी वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आज महामार्गावर पाहायला मिळाले.

आज दुपारनंतर मुंबईहून पुण्याच्या दिशेने, तसेच मुंबईकडे मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्यामुळे वाशी उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होती. दुसरीकडे पनवेलहून सायन जाण्याच्या मार्गावरही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मानखुर्दपासून वाशी टोलनाक्यावर दुतर्फा वाहनांच्या गर्दीमुळे अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मानखुर्द ते वाशी टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा – उरण : चिरनेरमध्ये मोकाट गुरे व माकडाचा उच्छाद; वाल, हरभरा आदी कडधान्याची पिके केली फस्त

हेही वाचा – भाताचे कोठार म्हणून ओळख असेलला उरण तालुका भूमिहीन होणार; एमआयडीसीसाठी उरणमधील तीन गावांचे संपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गावर दररोज सोमवार ते शुक्रवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, सुट्टीच्या दिवशी कामानिमित्त बाहेर पडावे तर नेहमीच असते वाहतूककोडी, असा अनुभव येत असल्याची माहिती मानसी इंगळे या प्रवाशाने दिली. नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असून काही मिनिटांच्या प्रवासासाठी सुट्टीच्या दिवशी अर्धा अर्धा तास लागत असल्याने नको रे बाबा रस्त्याने प्रवास, अशी नाराजी प्रवासी व्यक्त करत होते.