तूम्ही तूमच्याहून वयस्कर व्यक्तीला समजावताना त्यांचा मूड पाहूनच समजवा असे सांगितले जाते. परंतू समोरील व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थित नसल्यास घरात महाभारत होण्याची दाट शक्यता असते. असाच काहीसा प्रकार पनवेल तालुक्यातील वाकडी गावातील वास्तुसिद्धी इमारतीमध्ये बुधवारी मध्यरात्री घडला. वाईट वर्तणुकीची समज दिल्याने भावजीने मेव्हण्याच्या मानेवर दारुच्या बाटलीने वार केल्याचा प्रकार घडला आहे. पंकज सरदार असे जखमी मेव्हण्याचे नाव असून, सुरेश शिरसाठ असे आरोपी भावजीचे नाव आहे.

हेही वाचा- हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे ठार करणाऱ्या पती आणि सासूला जन्मठेप; ६० हजारांचा दंडही ठोठावला

भावजींच्या अनेक तक्रारींचा सामना कुटूंबाला करावा लागत असल्याने त्यांचा मेव्हणा त्यांना लोकांना फसवत जाऊ नका अशा चांगल्या वर्तणुकीची समज देत होता. अचानक भावजींना राग आला आणि त्याने टेबलावरील दारुची बाटली टेबलवरच फोडली. फुटलेली बाटली थेट मेव्हण्याच्या मानेवर वार केला. रक्तबंबाळ झालेल्या मेव्हण्यासह त्यांची पत्नी या मारहाणीत जखमी झाली. वर्तणूकीच्या धड्याचे हे प्रकरण पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गेले. वर्तणूकीचे धडे देणा-या मेव्हण्याला भावोजींविरोधात तक्रार द्यावी लागली. अखेर या प्रकरणात जखमी पंकज सरदार यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर मुंबई येथे राहणारे सूरेश शिरसाठ यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.