नवी मुंबई : सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई नवी मुंबई ठाणे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्यावर शेकडो गाड्या एकाच वेळेस दिसून येत आहेत.

शनिवार रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने या सलग तीन सुट्ट्या शहराबाहेर निवांत घालवण्यास वा गावाकडे राहण्यास मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत. त्यामुळे शीव पनवेल मार्गावरील वाशी आणि खारघर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी सदृश्य स्थिती झाली आहे. त्या मानाने हलक्या वाहनांना पथकर नसल्याने खारघर पथकर नाक्यावर कमी गर्दी दिसून येत आहे.

हेही वाचा…नेरुळ डीपीएस तलावात भरतीच्या पाण्याचा प्रवाह येण्यासाठी जलवाहिन्या उघडल्या, सिडकोची पालिकेविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक वाहनांच्या रांगा खालापूर पथकर नाक्यावर दिसून येत असून सुमारे एक किलोमीटर पर्यंत या रांगा आहेत. विशेष म्हणजे सध्या फार क्वचित व्यक्ती वापर करून पथकर वसुली होते अन्यथा वाहन हलके असो वा जड किंवा अवजड बहुतांश वाहनांना फास्ट टॅग सुविधा असते तरीही एवढी गर्दी होत असल्याने वाहन चालकात आश्चर्य व्यक्त होत आहे.असे असले तरी द्रुतगती मार्गावर लोणावळा व्यतिरिक्त फारशी कुठेही वाहतूक कोंडी दुपार पर्यंत नव्हती. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने संध्याकाळ  नंतर वाहतूक कोंडो होऊ शकते अशी माहिती एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दिली.  तेव्हा जर या सुट्टीच्या दिवसात मुंबई बाहेर जायचे असेल तर पथकर नाक्यावर लागणारा वेळ लक्षात घेऊन त्या प्रमाणे नियोजन करावे.