नवी मुंबई : पुण्यातील अपघात प्रकरणा नंतर अनेक बेकायदा पब आणि बार वर कडक कारवाई करण्यात आली असून देशभर हे प्रकरण तापले आहे. याच अनुषंगाने आपल्याही शहरात असे होऊ नये म्हणून बुधवार आणि गुरुवारच्या रात्री नवी मुंबई मनपा, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पणे कारवाई करत १० डान्सबार, ५ पब, लिकर बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. 

पुण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही पब संस्कृती बळावत आहे. रात्रभर अनेक बार पब हुक्का पार्लर सुरु असतात हे उघड सत्य असून त्यावर अधून मधून कारवाई केली जाते. मात्र पुण्यातील किसननगर अपघात प्रकरणातील आरोपी पब मधून बार पडला होता आणि त्यांमुळे पब आणि पाठोपाठ रात्रभर चालणारा हा प्रकार प्रकाशझोतात आला. त्यामुळे पुण्यात अनेक बार पब कारवाईच्या कचाट्यात अडकल्या. याच अनुषंगाने नवी मुंबईतही अचानक पण मात्र नियोजन बद्ध रित्या रात्रभर पब लेडीज बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा…नवी मुंबई: आरटीओची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ . राहुल देठे यांनी सांगितले कि वाशी , तुर्भे,नेरूळ , सीबीडी येथील १० डान्सबार, ५ पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, परवानगी पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. यावेळी पब , डान्स बार मधील नियमबाह्य बांधकामही तोडण्यात आली आहेत.