नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या पाच आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सीबीडी येथे आठ लाखांचा दरोडा टाकून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सीबीडी पोलिसांनी गुजरात सीमेवर त्यांना जेरबंद केले. त्यांच्या कडून ९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे दिवसा घरफोडी करीत असे. सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०६ ग्रॅम वजनांचे सोने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून घरफोडी केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती.

हेही वाचा : पनवेल पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे

या गुन्ह्याचा तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना गुजरात सीमेवर पकडले. पोलिसांनी शोध घेत परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या पाच आरोपींना गजाआड केले आहे व त्यांच्याकडून अधिक चौकशीत त्यांनी केलेल्या आणखी चार गुन्ह्यांची उकल देखील करण्यात आली आहे. या पाचही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून हे गुन्हेगार अगदी सराईत आरोपी आहेत. पालघर मार्गे गुजरातला जाण्याच्या तयारीत असताना गुजरात सीमेवर या आरोपींना सीबीडी पोलिसांनी गजाआड केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.