उरण : राज्य सरकारकडून पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी करण्यात आलेली मासेमारी बंदी १ ऑगस्टपासून उठली आहे. मात्र खवळलेला समुद्र नारळी पौर्णिमेनंतरच पूर्व स्थितीत येऊन शांत होत असल्याने त्यानंतरच मोठया प्रमाणात मासेमारी नौका खोल समुद्रात उतरविण्यात येतात. त्याच्या तयारीसाठी उरणच्या मोरा बंदरातील नौकांच्या दुरुस्तीची लगबग सध्या सुरू आहे.

हेही वाचा : गडहिंग्लज : विनयभंग प्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल; वाचा नेमका काय प्रकार आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नौकावरील खलाशी नौकांवरील जाळी व मासेमारीसाठी आवश्यक असलेले सामान नौकेवर चढविण्याचे तसेच रंग रंगोटी आणि नौकेची डागडुजी करण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी अनेक नौका मोरा बंदराच्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत.