नवी मुंबई: आज सकाळी सातच्या सुमारास नवी मुंबईतील एनआरआय संकुलातील एका सदनिकेत भीषण आग लागली. सदनिका सतराव्या माळ्यावर असल्याने आग विझवण्यात खूप अडचणी येत असून सुदैवाने यात अद्याप तरी कोणी जखमी झाले नाही.

आज सकाळी नवी मुंबईतील सर्वात उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स मधील ४७ व्या इमारतीच्या १७ व्या मल्यावरील सदनिकेला आग लागली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार येथे कोणी राहत नसल्याने आग कशामुळे लागली तसेच नेमकी किती वाजता लागली हे समोर आले नाही. मात्र आगीने सातच्या सुमारास रौद्र रूप घेतल्यावर या बाबत आसपासच्या लोकांना माहिती झाले . त्यांनी अग्निशमन दलास माहिती देताच अग्निशमन दल पोहचले.

हेही वाचा : Airoli Assembly constituency : महायुती आणि मविआत अंतर्गत रस्सीखेच; ऐरोलीसाठी कोण ठरेल वरचढ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशी अग्निशमन दलाचे ग्रांटो गाडी पोहचली त्यानंतर आग विझवण्यास सुरूवात झाली. नऊच्या सुमारास आग आटोक्यात असून आसपासच्या सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सदर इमारतीतील स्वतःची अग्निशमन यंत्रणा सुरू आहे की नाही याबाबत माहिती मिळवून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.