नवी मुंबई: आजकाल आर्थिक माहितीबाबत इंटरनेटवर सर्च केले की त्यावर नजर ठेवणारे तुम्हाला फोन करून तुम्ही सर्च केलेल्या विभागातून बोलत असल्याचे सांगतील आणि एखादा ॲप डाऊनलोड करण्यास सांगतील, ज्यात बँक डिटेल्स भरावे लागतात. रिमोट कंट्रोल ॲप डाऊनलोड करावयास सांगून त्याद्वारे बँक खाते रिकामे होऊ शकते. असाच प्रकार अलीकडेच नवी मुंबईत समोर आला असून या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणातील फिर्यादी महिला यांना पीएफ अर्थात निवृत्ती निधीबाबत माहिती हवी असल्याने त्यांनी आपल्या मोबाइलवर शोधाशोध केली, मात्र फारशी आवश्यक माहिती न सापडल्याने त्यांनी शोध थांबवला. मात्र काही वेळात त्यांना एक फोन आला. त्यावरील व्यक्तीने पीएफ कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत समस्या काय आहे याची विचारणा केली. पीएफ क्रमांक व बँक खात्याची माहिती मागितली आणि एअर कंट्रोल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. हा ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याचा आयडी मागितला. फिर्यादीने पीएफ क्रमांक आणि आयडी दिला. मात्र बँक खात्याची मागणी करण्यास नकार दिला. त्यानंतर संवाद बंद झाला.

हेही वाचा…. रायगड : खारघर हाऊसिंग फेडरेशन सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

हेही वाचा…. ४० % परतावाचे आमिष भोवले, ६ लाख १३ हजारांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएफसंबंधीची माहिती देणारा ॲप म्हणून फिर्यादी महिलेने ईपीएफओ नावाचा ॲप डाऊनलोड केला. मात्र त्यात १० रुपये भरावे लागणार असल्याने त्यांनी बँक खात्याची माहिती व एमपिन दिला. हे करताच काही वेळात बारा वेळा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले आणि प्रत्येक वेळी पाच हजार रुपये काढले गेले. तसेच त्यांच्या अन्य बँक खात्यांतून चार वेळेस पैसे काढले गेले. असे एकूण ८० हजार काढण्यात आले. याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारी वरून एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.