नवी मुंबई : आज पहाटे नवी मुंबईतील जुहूगाव येथील एका बार मधील कामगाराची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. वाशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जुहू गाव येथील कपिल बारमध्ये काम करणारा एक कामगार कोपरखैरणेत राहतो . आज काम संपल्यावर पहाटे तो घरी जाण्यास बस थांब्यावर उभा असताना वाशीकडून काही युवक येथे आले. त्या कामगारांकडे एक पिशवी होती. त्यात काही मौल्यवान वस्तू असावी अशा शंकेने त्या अनोळखी व्यक्तीनीं कामगारांकडून ती पिशवी व मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : नवी मुंबईतील ‘नवनगरा’स तीव्र विरोध; कोकण भवनात शेकडो गावांमधून १० हजारांवर हरकती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, कामगाराने प्रतिकार करत येथीलच एका गल्लीतून पुन्हा बार मध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या गल्लीच्या तोंडाशी मारेकऱ्यांनी त्याला गाठले व त्याच्यावर चाकूचे वार करण्यात आले. हा हल्ला एवढा भीषण होता कि तो कामगार जागीच ठार झाला. त्याला वाचवण्यासाठी अन्य एक व्यक्ती आला त्याच्यावरही वार केले करण्यात आले.  अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली. तसेच सदर घटना कशी नक्की किती वाजता आदी बाबत तपास सुरु आहे असेही भटे यांनी सांगितले