नवी मुंबई : छत्रपती उदयनराजे यांना दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांनी भेट न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशीच भावना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत असलेले स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित माथाडी मेळावा पार पडल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा : नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथी निमित्त माथाडी भवन येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांच्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.  सातारा लोकसभेसाठी इच्छुक असणारे उदयनराजे ३ दिवसांपासून दिल्ली मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांना भेट मिळत नसल्याने आम्हालाही वाईट वाटतंय. एकीकडे आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो दुसऱ्या बाजूला ते राज्यसभेचे सदस्य आहेत, असे असताना भेट मिळत नसेल तर उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल असे म्हणत निर्णय माझ्या बाजूने लागू दे अथवा त्यांच्या बाजूने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४०० पारचे योगदान देण्यामध्ये आम्ही दोघेही संयुक्तपणे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.