नवी मुंबई : होळीची वर्गणी कमी दिली म्हणून एका दुकान मालकाला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्याला सोडवण्यास आलेल्या त्याच्या मित्रालाही बेदम मारहाण करण्यात आली, शिवाय दुकानाची तोडफोडदेखील करण्यात आली. सध्या फिर्यादी व त्याच्या मित्रावर उपचार सुरू असून, या प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईराज चव्हाण, सुरेश चव्हाण, नरेश काटे, आणि अविनाश चव्हाण, अशी आरोपींची नावे आहेत. प्रेमचंद शाहू यांचा हमुमाना नगर तुर्भे येथे प्रेम मनी ट्रान्स्फर नावाचे दुकान आहे. होळीच्या दिवशी आरोपी दुकानात आले व जबरदस्ती होळीची वर्गणी मागू लागले. पैसे जास्त नसल्याने शाहू यांनी ५० रुपये वर्गणी दिली. मात्र एवढीच वर्गणी का? म्हणून या चौघांनी शाहू यांच्याशी वाद घालणे सुरू केले. मात्र पैसे जास्त नसल्याने शक्य नाही, असे सांगितल्यावर आरोपींनी शाहू यांना दुकानाबाहेर काढत मारहाण सुरू केली.

हेही वाचा – जागतिक महिला दिनी नवी मुंबई पालिका महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानासह माझी वसुंधरेची सामूहिक शपथ

हेही वाचा – नवी मुंबई: महिला दिनी महिलांची जागृती व काव्य जागर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी त्यांच्याजवळील टोकदार वस्तूने वार केल्याने शाहू यांच्या मनगटातून रक्त वाहू लागले. हे पाहून शाहू यांचा मित्र फिरोज शेख हा मारामारी सोडवण्यासाठी धावला. मात्र त्यालाही आरोपींनी चोप दिला. तसेच फिरोज याच्या डोक्यावर बांबूचा घाव घातल्याने रक्तस्त्राव झाला. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी शाहू यांच्या दुकानाची मोडतोड केली. हे सर्व पाहून परिसरातील लोक मदतीला धावून आल्याने आरोपींनी पलायन केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच आरोपींविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.