महावितरणाच्या ठाणे २ विभागातील वीज चोरांविरुद्ध मोहिमेत, नोव्हेंबरच्या पहिल्या ९ दिवसात केलेल्या कारवाईत २१ वीजचोऱ्या पकडून तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस केली आहे. सदर वीजचोरी मोहीम मुख्य अभियंता, भांडूप नागरी परिमंडल, धनंजय ओंढेकर यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक अभियंता, अरविंद बुलबुले, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-२ विभागात राबविण्यात आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : २ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तहसीलदारसह एजंटवर कारवाई

सध्या महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वीजचोरी पकडण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. त्यामुळे संशयित ठिकाणी राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ठाणे-२ विभागातील विकास उपविभागांतर्गत राबोडी, चिरागनगर, बालकुम व इतर ठिकाणी तसेच पॉवर हाऊस उपविभागातील महागिरी, नागसेनगर, डाँ.आंबेडकर रोड, उथळसर व इतर ठिकाणी संशयित वीजचोरीच्या ठिकाणांची तपासणी विभागीय व उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्या पथकांनी केली असता २१ वीज चोऱ्या उघडकीस आल्या असून अंदाजित वीजचोरी रक्कम ९.६० लक्ष आहे.

ठाणे-२ विभागाअंतर्गत वीजचोरी तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १८५ ग्राहकांकडे ८० लाख ७१ हजार रुपये रक्कमेच्या वीजचोरीच्या उघड झाल्या असून १३३ ग्राहकांकडून वीज चोरीपोटी ६०.९२ लाख वसूल करण्यात आले आहेत. तर २८ ग्राहकांवर वीजचोरी प्रकरण गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा- उरणमध्ये एमआयडीसीकडून आठवड्यातील दोन दिवसांची पाणी कपात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढील कालावधीत वीजचोरी विरुद्ध तपासणी मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, अनधिकृत विजेचा वापर करू नये तसेच आवश्यकतेनुसार विजेचा योग्य वापर करावा जेणेकरून वाजवी वीज बिल येईल. अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.