लोकसत्ता टीम

नवी मुंबई: वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत डिसेंबर-जानेवरीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती. परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष बाजारात दाखल होण्यास सुरुवात असून दररोज ३०-३५ गाड्या दाखल होत आहेत.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष फळाच्या आवक सुरू होते. तसेच जानेवारी मध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबरनंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत असून १५ एप्रिल पर्यत हंगाम सुरू असतो. परंतु यावर्षी अवकाळी पावसामूळे द्राक्षांच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे. आत उष्णता वाढत असून सध्या द्राक्षाच्या बागेला पोषक असे ऊष्ण वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरवात झालेली आहे.

आणखी वाचा- नवी मुंबई: हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

बाजारात गोड द्राक्ष दाखल होत असून याला मागणीही वाढली आहे. नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगलीमधून द्राक्ष दाखल होतात. घाऊक बाजारात सफेद द्राक्षाच्या १० किलोला आधी ६००-९००रुपये दर होता. आता त्यामध्ये५०-१००रुपयांनी घसरण झाली असून ५००-८००रुपयांनी उपलब्ध आहेत. तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ५०-६० रुपयांनी विक्री होत आहे.