उरण : खारकोपर ते उरण रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या जासई मधील प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात सोमवारी सिडको भवन बेलापूर मध्ये झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना सिडकोने पुन्हा एकदा आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये जासई मधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या भूमी व भूमापन विभागाने सहा महिन्यात साडेबारा टक्के भूखंड देण्याचे आश्वासन लेखी दिले होते. त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाचे काम बंद करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत सिडको कार्यालयात न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश धुमाळ यांनी मध्यस्थी करून सोमवारी चर्चा घडवून आणली. या बैठकीत सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी भूखंडाचे इरादापत्र लवकरच देण्यात येईल असे आश्वासन जासई येथील प्रकल्पग्रस्तांना दिली आहे. खारघर मधील पंतप्रधानाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या सूचनेवरून आंदोलन स्थिगत केले असून प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असे मत जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत यांनी दिली आहे. यावेळी रमाकांत पाटील,हरिभाऊ म्हात्रे,महादेव पाटील,हरी म्हात्रे आदीजण उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० ऑक्टोबरला आढावा

सिडकोच्या आश्वासना नंतर कोणती कारवाई झाली यासाठी २० ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त व सिडको यांच्यात बैठक होणार आहे.